रिद्धी

या सोनेरी दिवशी
तू जन्मलीस
आणि आम्हीही जन्मलो
आईबाबा म्हणून...

चिमुकल्या पावलांनी
आलीस आमुच्या जीवनी
घेऊनी आनंदी आनंद

अश्रू किती अनमोल असतात
हे तेव्हाच कळले जेव्हा
तु टाहो फोडलास मी आले म्हणून...
अजूनही तो आवाज
कानी घुमतो आहे...

बदलले दिवसांचे चक्र
सुंदर झाले आयुष्य
घराला आला जिवंतपणा
सजीव झाल्या भिंती अन दिशा

गोड गोड गोडंबी आमुची
नाजूक परी सुंदर जशी
गोबऱ्या गोबऱ्या गालांची
टपोऱ्या बोलक्या डोळ्यांची

लवकर लवकर काळ सरकला
मांडीवरून तर कधी कडेवरून,
मग रांगत रांगत
कधी पळू लागलीस घरभर

नकळत गेली दोन वर्षे
मस्त आनंद जाहला हर्षे
अशीच सदैव सुखी राहा
हाच वरदहस्त तुला !!

Comments

Popular posts from this blog

“एक दिवस राजगड”

ओसाड

वेळ ...