“एक दिवस राजगड”

     


खुप दिवसात कुठे ट्रेक किंवा बाहेर रपेट मारण्यासाठी निघालो नव्हतो सतीश आणि माझ्या मनात कुठे तरी जायचे असं महिनाभर चालू होते ठरत आणि कॅन्सल होत वर्षाचा पण नुकताच तिकोना किल्ला ट्रेक करुन झाला होता त्यामुळे माझंही मन कासाविस झालं होत कात्रजसिंहगड खुप दिवसापासुन मनात होतं हा ट्रेक रात्रभर चालण्याचा आहे अशी रात्र मला अनुभवायची होती मनाचीही तयारी झाली होती पण जायची वेळ काही येत नव्हती

    काल सतीश दुपारी ऑफिसवर आला काम करत असतांना, त्याने विचारले आज रात्री निघायचे का? मी तर अगदी पायाच्या एका बोटावर तयार हातो मग लगेच त्याने त्याच्या मित्राला फोन लावला तो नेमका बारामतीत होता मला वाटलं, प्लॅन फसतोय की काय ? पण नाही, सतीश म्हणाला की ६ पर्यंत सांगतो मी पण जोमाने कामं संपवण्याच्या मागे लागलो नशीबाने सात वाजता सतीश चा फोन आला की नऊ वाजता तयार रहा, मी येतोय घ्यायला ! माझी गडबड सुरु झाली, काय करु काय नाही असे होऊ लागले शेवटी सतीश आला, पण ठिकाण वेगळे होतेकिल्ले राजगड !!

    वा ऽऽ राजगड म्हणजे गडांचा राजाअसे म्हणायाला काही हरकत नाही! मनात निरनिराळी चित्रं रंगण्यास सुरवात झाली तसं सिंहगड भरपूर वेळा चढुन माहिती, रायगडावरील पायऱ्या, लोहगडावर भरपूर चालणे एवढच माहिती होती राजगड कसा आहे हाच प्रश्न माझ्या मनात सुरु झाला त्यातुन रात्री गड चढायाचा होता ! तयारी सुरु झाली बिस्किटे-गोळ्या, पाण्याच्या बाटल्या, एक शाल-कानटोपी, कॅमेरा आणि मुख्य म्हणजे बॅटरी. वर्षाने एकदोन गोष्टी भरुन सॅक सज्ज झाली पटकन जेवलो सर्वांचा निरोप घेतला

    तिसऱ्या मित्राकडे निघालो मला तो अनोळखीच होता त्याच्या घरी पोहोचताच आम्ही हॉर्न वाजवला साहेब बनियनवरच बाहेर आले ! सतीश चिडला,‘‘पंक्या अजून तू तयार नाही?’’ पंकज, ‘‘अरे सॅक सापडत नाहीेये’’ पंकज अनुभवी आणि उत्साही आहे असे सतीशने मला सांगितले होते त्यामुळेमी त्याचे निरीक्षण करु लागलो तसा तो दमुन बारामतीवरुन आला होता आणि लगेच आमच्याबरोबर येण्यास तयार होता मी त्याच्या जागी असतो तर, मी येत नाही, मी दमलोय, असे कारण सांगितले असते बरीच शोधाशोघ करुन सॅक सापडली मग कटर, बाटल्या, स्लिपींग बॅग, निरनिराळ्या उपयुक्त बारीकबारीक गोष्टी (लायटर, बॅटरी, सेल इ) एकदाच्या सॅकमध्ये बंदिस्त झाल्या हळूच घरातून हिटलॉन पण आणली त्याने उत्साहाने गावात जाऊन हिटलॉन खरेदी केल्या होत्या ‘‘कशाला घेतोय, चल लवकर आता आणि आता काय शोधतोय ?’’ सतीश उद्‌गारला !

    पंकजची नजर माझ्या बुटांवर पडली होती ‘‘हे बुट चालणार नाहीत तुझ्याकडे हंटर शुज नाहीत ? थांब माझ्या कडे दुसरे आहेत, ते होतात का बघ’’ साहेबांच्या बुटात एकदाचे माझे पाय घुसले आणि शेवटी आम्ही निघालो चौथ्या गड्याने डीच्चु दिला होता त्यामुळे तिघेच निघालो

    सतीशने आधिच क्लिअर केले कि स्पीड माझा कारण पंक्या पडला मोटरक्रॉस चॅम्पीयन त्याच्या स्पीडने जायचे म्हणचे आम्ही नक्कीच हातपाय तोडून घेतले असते

    किक मारली, गाड्या पळू लागल्या पण दोनच मिनिटात थांबल्या! तुम्ही म्हणाल की आता काय झालं ? मला पण हाच प्रश्न पडला पंकजने एका बेकरीजवळ गाडी थांबवली ब्रेड, जॅम, सॉस, पुढे इलेक्ट्रॉल वगेरे घेतले मी मनात म्हणले की याची काय गरज ? पण पंकज म्हणजे एक अनुभवी ट्रेकर ! त्यामुळे त्याचा काहीतरी उद्‌देश असेलच

    आमचा राजगडच्या दिशेने प्रवास सुरु झाला. पुढे दोनचार मिनीटातच पर्वतीजवळच एक बेवड्याने पंकजची गाडी अडवली आणि त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण अजून काही घडण्याच्या आधीच पंकजने अॅक्सीलेटर वाढवला त्यामूळे बेवडा थोडा फरपटला गेला एक तर झोपडपट्‌टीचा भाग त्यातुन मनुष्य टाईटथांबणे अगदीच निरर्थक होते असो हा प्रकार होऊन आता मात्र सावध पुढे नव्या कात्रज बोगद्याच्या दिशेने निघालो

    मी सतीशच्या मागे बसलो होतो जसा मी बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो होतो तसाच बऱ्याच दिवसांनी मी मागे आयता आरामात बसलो होतो बघताबघता बोगदा आलाआणि मी कॅमेरा सज्ज केला ! गाडीच्या वेगामुळे कॅमेऱ्यात वेगवेगळे इफेक्टस्‌ येत होते बोगदा पाहून माणसाच्या प्रगतिचे एक उदाहरण दिसले आपण युरोपमध्येच पोहोचलो की काय असे वाटते व्हॅन्टीलेटर्स, आतील दिवे, आतील दिवसाचा आभास होणारा उजेडक्षणभर एक वेगगळाच अनुभव !

    बोगदा ओलांडताच गारवा वाढला आकाशात असंख्य चांदणं दिसू लागलं प्रदुषणामुळे आपल्याला शहरातून असे दृश्य बघायला मिळणे तसे दुर्मिळच ! वाऱ्याला कापत आम्ही पुढे जात राहिलो वाऱ्याने सतिशच्या डोळ्यातून येणारे पाणी माझ्यावर उडू लागले रस्ता चौपदरी असल्यामुळे नसरापूर फाटा फारच लवकर आला मनात आले की आता काही क्षणात राजगड पायथा येणार पण कुठलं काय?

    जातोयजातोय तरी राजगडचा बोर्ड देखील दिसत नव्हता सगळ्या बाजूंनी भयाण अंधार फक्त आकाशातील चांदणं आमच्या सोबतीला. एखादं गाव जवळ आले की रस्ता खराब, इतरत्र चांगला होता आणि काळोखात एकदाचा राजगडचा बोर्ड दिसला - ८ किमी आठ !!! बापरे, आता गाडीवर बसणे मुश्किल झाले होते नागमोडी रस्त्याने आम्ही पुढे जाऊ लागलो. सतिशने अंधारातच राजगडाची आकृती दाखविली तो बघता बघता मी विचार करु लागलो, कि हा किल्ला रात्री कसा सर करायचा ?

    काही वेळातच किल्ले राजगड पायथा आला पायथ्याला एक हॉटेल आहे हॉटेल वाल्याने चित्रांचे व राजगडावर सापडलेल्या ऐतीहासीक वस्तुंचे संग्राहालय केले आहे गाड्‌या पार्क्कींग करायला नेल्यावर मी बघुन थबकलोच बारा ते पंधरा ट्रुव्हिलर व ३५ फोर व्हिलर बरेच उत्हाही मेंबर अधिच आले होते काळाकुट्ट आंधार होता बॅटरीच्या प्रकाशात काय दिसते ते पाहू लागलो आता पूढे काय कारायाचे ? याविचारात हॉटेलच्या कट्यावर आम्ही ठीया मांडला पंकज म्हणाला की बेटर वे आपण आता ईथेच झोपून पाहाटे चालायला लागू . ओको म्हणून सतीश ने मी तयार झालो. त्याच हॉटेलच्या जागेत मस्तपैकी हिटलॉन अंथरले. साहेबांनी त्याची स्लीपिंग ब्याग उघडली. शनिवार संपून रविवार येत होता. क्षणात दोघेही घर्रर्र घुर्र्र्र घोरू लागले. मला काही लवकर झोप लागत नवती. शेजारी असलेल्या एका कुत्र्याचं खुडबुड व आकाशातील चांदणे पाहत निद्रा कधी आली आणि मोबाईल वर गजर वाजला. उत्साहाने आह्मी उठलो. ५ वाजले होते. बर्याच दिवसांनी मी हे पाच पाहिले होते. हावेत गारवा होता. तयारी करून पक्ष्यांच्या किलबिलाटात आमचे चालणे सुरु झाले.

    आता पूर्ण उजाडले होते. सुरवातीला तसे सपाटीच होती. दोन झाडाची खून दाखवत पंकजने आह्माला वाट दाखवली. थोड्या बोचर्या वार्याने माझे थोडे डोकेहि दुखत होते. पुढे हे दोघे पायी सपासप मारत चालत होते. सर्व दिशाने निसर्ग अप्रतिम दिसू लागला. सुर्यादायाचे थोडे फोटो काढे पर्यंत दोघेही लांब जाऊन बसले होते. पटापट पावला उचलत राजगडाकडे आमची घोडदौड चालू झाली. पंकज आता सर्व माहिती सांगायला लागला.हे नेढ, हि संजीवनी माची, आपण चोर दरवाज्याने आत जाणार आहोत. वगरे वगरे. सुंदर असे दृश्य दिसू लागले. मान खूपच प्रफुलीत झाले होते.

    सूर्य आता आग ओतायला लागला होता. थोडा वेग मंदावला होता त्यात करवंदाची जाळी. आजूबाजूला काही आंब्याची, बांबू, बबली आणि रानटी झाडे दिसत होती. अचानक  माझ्या मागून कोणीतरी येत आहे असे जाणवले. मागे वळून बघतोच कि कळले कि एक कुत्रा पाठोपाठ येत होता. त्याला थोडे प्रेमाने गोंजारले तर तो अगदी ओळख असल्या सारखे शेपटी हलवत पायात पायात चालू लागला. मधूनच तो रानात धावत जायचा आणि परत यायचा.

    आता आह्मी मध्य पर्यंत येऊन पोहोचलो होतो. पुढे जसे जसे वर जाऊ लागलो तसे राजगड स्पष्ट दिसू लागला. थोडी पायवाट नाहीशी होऊ लागली आणि मी काही पुढे बोलणार तोच पंकज म्हणाला कि आता आपण चोर दरवाज्य कडे निघालो आहे, त्यमुळे मधूनच वाट काढत आपल्या जायचे आहे. उत्सुकता वाढत होती, चोर दरवाजा कसा असेल, पुढे कसा किल्ला दिसणार आहे वगरे वगरे... क्षणात पहिला rockpatch आला आणि माझ्या आयुष्यातला देखील. उंच असा खडक, त्याला लोखंडी सळया लावल्या होत्या. त्याचा आधार घेत घेत आह्मी तो खडक चंदू लागलो. खाली दरी मध्ये उन्हाळा असला तरी झाडी हिरवीगार पसरली होती. पावसाळ्यात तर सबंध परसर कसा दिसत असेल हा विचार करत मी पुढे सरकत होतो आणि पुढे चोर दरवाजा दिसलाच. दरवाजा म्हंटले कि आपल्याला खूप मोठा असा बुर्जा मध्ये दरवाजा डोळ्या पुढे दिसतो. पण साधारण तीन फुट रुंद अंड चार फुट . त्या दरवाज्यात पटकन आत शिरता येऊ नये म्हणून एक डोक्याला लागेल असे एक रचना केली होती. ते बघून मी थक्क झालो. विचार आला कि त्यवेळी कसा विचार ते लोक करत होती. दरवाज्याला नमस्कार करून, शिवाजी महाराजांचे नावाचा गजर करत आह्मी किल्ल्यात शिरलो. पुढे लागेच आह्माला एक पाण्याचे कुंड दिसले. पंकजने लगेच हे पाणी पिण्यास उपयुक नाही अशी सूचना केली. थोडे चालल्यावर पायर्र्या दिसल्या. थोडे आमच्या सारखे मावले आधीच आले होते. आता मात्र विश्रांती साठी मी आणि सतीश ने पंकज ला खुणावले. पद्मादेवी च्या मंदिरात आपल्याला विश्रांती घ्यची आहे असे उत्तर पुढून आले.

    पुढच्या पाच मिनिटात मंदिर आले देखील. आत शिरतात बघतो तर किमान तीस चाळीस मुले विश्रांती घेत होते. तिथेच एक कोपरा पकडून आमचे समान आणि शरीर असे सोडून आडवे झालो. मंदिरात थोडा अंधार होता. दगडी बांधकामामुळे आत थंड होता. एक दारातून माल दोन टाक्या दिसल्या. उत्साही कार्यकर्ते पावसाळ्याआधी एका टाकी साफ करण्याचे काम चालू होते. त्यात बराच गाळ साठला होता. बाहेरील तटबंधीवर बसून समोरील नजरा पाहत होतोच कि पंकजच्या ओळखीची एक ताकवाली आली. ताक पीत पीत मस्त गप्पा चालू झाल्या. तटबंधीवर बसून मी मस्त रविवार एन्जोय करत होतो. मंदिरा शेजारी काही मुलांचा ग्रुप एका चुलीवर म्यागी करत होती. चूल पेटवून त्यांनी पाणी गरम करण्यास ठेवले होते आणि एका ताटात ४-५ म्यागी चे पुडे ठेवले होते. सगळी मुला त्या चूल आणि पाण्याकडे पाहत होती, तर दुसर्याबाजूला ४-५ माकडाची एकाएक आली आणि हळूच सर्व पुडे घेऊन मंदिराच्या छतावर चढून बसली. अगदी त्यांना शिकवल्या सारखे त्यंनी ते बाहेरील प्लास्टिक फोडून आतील म्यागीचा आस्वाद लुटला. मुलांना त्यांच्या तोंड कडे बघण्याच्या पलीकडे काही उरले नव्हते. चिडून त्यांनी पाणी ओतून दिले. बिचारे, पण की करणार. निसर्गात आपले काही चालत नाही.

    आता बालेकिल्ल्यावर जायचे होते. पंकज ने सुचवले कि बालेकिल्ला महत्त्वाचा, तो आधी बघू. उन पण वाढत होते. साधारण ९ वाजता बालेकिल्ल्याच्या दिशेने चालू लागलो. तसा राजगढ खूप मोठा किल्ला, एका टोकापासून दुसरे टोक गाठ्याला दमछाक होते. पाणी गटागट संपत होते. पुलंच्या भाषेत नुसता घाम ने घाम. पुढे बालेकिल्ल्याचा rockpatch आला आणि छातीत धस्स झाले. ९० अंश्या मध्ये हा खडक, आपण चढू कि नाही असा मनात विचार आला.दोन्ही बाजूनी हात धरण्याकरिता सळया आणि अधे मध्ये खडकात पाय ठेवण्य पुरते कोरले होते. एकवेळेला एकाच माणूस उतरू किव्हा चंदू शकतो इतकी निमुळती जागा. त्या चढाई ची थ्रिल घेत समोर बाले किल्ल्याचा दरवाजा आला. दमून आम्ही तितेच सावलीत बसलो. समोरील दरीचे दृश्य तिथे बसल्यावर कळते. तिथले वर्णन लिहिणे अगदीच कठीण. समोरील सर्व डोंगर अगदी ठेनगे दिसत होते. हे बघूनच शिवाजी महाराजांनी हा किल्ला का राजा म्हणून निवडले याचे उत्तर समजले. वरती एक छोटे शंकराचे मंदिर आहे, त्यच्या सावलीत आह्मी आमची बुड टेकवले. आता मात्र कडाडून भूक लागली होती. ब्रेड, ज्याम, sause, बिस्किटे, फरसाण असा बेत होता. शेजारीच दोन पाण्याचे कुंड होती. चार घास खायीपर्यंत टाकवाला एक मुलगा गावरान गाणी म्हणत आला. टाक पिऊन त्यालाही पंकजने sandwich करून दिले. तोही बिचारा खुश झाला. वयाने साधारण १४-१५ वर्षाचाच. शाळेला  सुट्टी होती , आई ला मदत म्हणून ताक, सरबत विकत होता. घरून ते गडावर व परत घर असे १२ तास तो राबत होता. इतके करून त्यच्या चेहऱ्यावर प्रस्संन भाव होते. मस्त गाणी म्हणत तो नाहीसा पण झाला.

    थोडी विश्रांती घेऊन पुढे किल्ला फिरायला सुरवात केली. वरच्या बाजूला शिवाजी महाराजांचा राजवाडा म्हणजे त्याचा पाया दिसतो. त्या काळातील मजबूत बांधणी दिसून येते. हे सर्व दगड, चुना वगरे समान गडावर कसे आणले असेल आणि त्याची निगा व्यवस्था कशी ठेवली असेल असा माझ्या मनात विचार येत होता. तिथल्या माती कडे पाहत आणि स्पर्श करत, महाराज येथून चालले असतील असा विव्हर माझ्या मनात येत होता. पुढे दारुगोळा, नाहणी घर, स्वयंपाक घर दिसते. येथून चारही दिशेला नजर अगदी सहज ठेवता येते. काय सोनेरी काळ असेल तो. घोषणा देत त्या वातावर्णाला, आजूबाजूच्या बुर्जाना त्या काळाची आम्ही आठवण करून दिली असेल. त्या भिंतीना किव्हा दगडांना जर मुख असत तर किती गोष्टी आपल्या समजल्या असत्या.

    बालेकिल्लावरील फेरफटका मारून, बघता बघता बारा कधी वाजले तेच समजले नाही. वेळेची मर्यादा पाहता संपूर्ण किल्ला आम्हाला पाहता येणार नवता. नेढ्यावर जाण्याची इच्छा पुध्याच्या वेळेस होईल असे मला जाणवू लागले. आता परत निमुळत्या जागेतून उतरायचे आहे हे विचार करत मला परत धडकी भरली. सतीश पण ह्याच विचारात गुंतला होता. पंकज मात्र आम्हाला घाबरत घाबरत म्हणत खाली उतरला. पण खरच अशी अवघड वाट मी अजून तरी पहिली नवती. कसाबसा खाली उतरून आह्मी पद्मावती मंदिरात कधी झोपी गेलो ते कळलेच नाही. कादाचीच उन्हामुळे हा थकवा आला होता. मंदिरात भरपूर उकडत होत, तरी शरीर तसेच पडून होते. दुसरीकडे मंदिरात बाकीच्या मुलांचा जेवण बनवायचा कायक्रम चालू होता. त्यामुळे झोप तशी लागलीच नवती. साधारण तीन च्या सुमारास पंकज आणि मला सतीशने उठवले. बळ बळ तिघेही तयर झालो, मस्त पाण्यात लिंबू मीठ, साखर टाकून सरबत बनवले. ते पिऊन रणरणत्या उन्हात , गरम गरम झळा खात आम्ही गडाला सलाम करून निघालो. रुमाल टोपी डोक्यावर चढवून आमचा पुढील प्रवास चालू झाला. थोडे राहिले आहे थोडे राहिले आहे असे मनाला समजावत मी हळू हळू उतरत होतो. पंकज आणि सतीश तसे पटापट उड्यामारात उतरत होते. पुढे पायथा दिसू लागला. आम्ही ज्या हॉटेल च्या काट्यावर रात्र काढली, तिथे आता बरीच गर्दी होती. मस्त पैकी ३ पोहे पंकजने ऑर्डर केले. पोहे खात खात दिवसभराच्या आठवणीनला उजाळा देत मस्त धमाल गप्पा झाल्या.

    आता कंटाळा होता तो म्हणजे परतीचा प्रवास. तो संपवत आम्ही पंकजच्या घरी पोहोचलो. तिथे माझे साधे बूट घालून, सतीश ने मला परत घरी सोडले. झकास आठवणी देवून राजगडने माझ्या मनात घर केले. खरच शिवाजी महाराजांचा हा किल्ला इतका जीवाळाचा का हे जाणवले.


Comments

Popular posts from this blog

ओसाड

वेळ ...