चांगले दाणे

चांगले दाणे वेचून केलेस मोठे
पोट मारून सोसले अनंते

उडायला शिकलो उंच आनंदे
दिसत नव्हते दमलेले खांदे

तयार झालो तुझ्या पंखाच्या उबेत
मारल्या भराऱ्या तुझ्या छायेत

शिकवण तुझी देवारुपी
येते अनुभूती क्षणोक्षणी

तुझ्या असण्याने असायची निश्चिति
आता कळते तुझी पोटतिडकी

लांब उडालो सुसाट फिरलो
पंख पसरुन वाऱ्याला चिरलो

दिलास धीर निराश मनास
सोडले घरटे घेऊन विश्वास

नवीन शोधली फांदी केला ध्यास
पण कमी झाला तुझा सहवास

नवीन आले पिल्लू गोड गुलाबी
आठवले तुझी सोबत आणि माझे बालपण

तुझे अनुभव पाहून चालू आहे प्रवास
पुढे पुढे सरकत, सहवास गेलाय संपास

या गुंतागुंतीची कसे सोडवू गाठी
उत्तर सापडत नाही राहिले फक्त आठवणी

पण उदास मनाला येते ताकद
तुझ्या शिकवणीने, आशीर्वादाने

नवीन उमेद नव्या जोशाने होतो सुर्योदय
पंख झटकून झेप घेतो शोधण्यास चांगले दाणे...

Comments

Post a Comment

Please write your name while commenting...thanks in advance
कृपया आपले नाव लिहावे... खूप धन्यवाद...