Posts

“एक दिवस राजगड”

Image
       खुप दिवसात कुठे ट्रेक किंवा बाहेर रपेट मारण्यासाठी निघालो नव्हतो सतीश आणि माझ्या मनात कुठे तरी जायचे असं महिनाभर चालू होते ठरत आणि कॅन्सल होत वर्षाचा पण नुकताच तिकोना किल्ला ट्रेक करुन झाला होता त्यामुळे माझंही मन कासाविस झालं होत कात्रजसिंहगड खुप दिवसापासुन मनात होतं हा ट्रेक रात्रभर चालण्याचा आहे अशी रात्र मला अनुभवायची होती मनाचीही तयारी झाली होती पण जायची वेळ काही येत नव्हती      काल सतीश दुपारी ऑफिसवर आला काम करत असतांना , त्याने विचारले आज रात्री निघायचे का ? मी तर अगदी पायाच्या एका बोटावर तयार हातो मग लगेच त्याने त्याच्या मित्राला फोन लावला तो नेमका बारामतीत होता मला वाटलं , प्लॅन फसतोय की काय ? पण नाही , सतीश म्हणाला की ६ पर्यंत सांगतो मी पण जोमाने कामं संपवण्याच्या मागे लागलो नशीबाने सात वाजता सतीश चा फोन आला की नऊ वाजता तयार रहा , मी येतोय घ्यायला ! माझी गडबड सुरु झाली , काय करु काय नाही असे होऊ लागले शेवटी सतीश आला , पण ठिकाण वेगळे होतेकिल्ले राजगड !!      वा ऽऽ राजगड म्हणजे गडांचा राजाअसे म्हणायाला काही हरकत नाही! ...

वेळ ...

Image
कोविडबाबा मुळे रोज ३० मैल प्रवास करू लागलो त्याच्या भीतीने मानवविरहित जगणं शिकू लागलो.  २० वर्षाच्या रुटिनला अचानक ब्रेक मारायला लागलो या नवीन बदलांचा शोध मी हळुवार घेऊ लागलो  नवीन वातावरणात नवीन रस्त्यावर रमु लागलो दिवस दिवस पुढे सरत,  थोडे थोडे हसू लागलो रोज धावपळ करणाऱ्या लोकांमधे मिसळू लागलो  घड्याळाच्या आज्ञेवर मी पण हळू हळू नाचू लागलो  पूर्वी रात्र दिवस न पाहणारा मी आता सूर्यदय अनुभवू लागलो माझ्या पत्रिकेमध्ये निद्रेलाही थोडे स्थान द्यायला लागलो आलेल्या नवीन दिवसांचं समतोल साधू लागलो आणि नवीन प्रवास, नवीन धोरण आखून जगू लागलो.  दडलेल्या इच्छा आकांक्षांकडे लक्ष देऊ लागलो  जाणिवांच्या पंखांची भरारी घेऊन उंच उडू लागलो  हेच आहे का स्थर्य, आनंद, समाधान असा विचार करू लागलो येणाऱ्या नवीन वळणाचा सामना निडरपणे करू लागलो.

ओखी

Image
 ४ डिसेंबर २०१७ आज तारीख आहे १९ एप्रिल २०१८. साधारण एक वर्षापूर्वी आम्हाला समजले की आम्ही आई बाबा होणार आहोत. वर्षाने जेव्हा मला हि बातमी दिली तेव्हा मी अगदी सुन्न झालो. बायको इतक्या आनंदात होती... तिला रडू आवरत नव्हते आणि मला हा आनंद इतका अनपेक्षित होता की मी काही री-ऍक्शन देऊ शकलो नव्हतो. खूप वाट बघायला लावणारी गोष्ट तुमच्या समोर आली तर काय होईल... तसेच माझे झाले... एकदम सुखद धक्का... या गोष्टीला बरोबर एक वर्ष झाले. त्यानंतर नऊ महिने कसे जातील.. टेन्शन, डॉक्टर, तपासण्या, आहार... गमतीत मी कळशी वगरे उचलायची नाही असे चिडवू लागलो... एकदमच दिवस बदलून गेले... आणि चुटकी वाजवल्याप्रमाणे पाहता पाहता ४ डिसेंबर कधी उजाडला हे कळलेही नाही. त्या दिवशी माझी किवा वर्षाची काय परिस्थिती होती, हे सांगणे खूपच कठीण आहे. आदल्या दिवशी डॉक्टरांनी उद्या ऍडमिट व्हा असे सांगितले तेव्हापासून ते दवाखान्यात ऍडमिट होईपर्यंत नुसते धडधडत होते. रात्री झोपच नाही... सकाळी केव्हातरी झोप लागली आणि लगेच निघायची वेळ !! हा सगळा प्रवास शब्दात मांडणे माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे पण लिहायचा प्रयत्न करतोय. बाबा !! कसा वाटतो...

रिद्धी

Image
या सोनेरी दिवशी तू जन्मलीस आणि आम्हीही जन्मलो आईबाबा म्हणून... चिमुकल्या पावलांनी आलीस आमुच्या जीवनी घेऊनी आनंदी आनंद अश्रू किती अनमोल असतात हे तेव्हाच कळले जेव्हा तु टाहो फोडलास मी आले म्हणून... अजूनही तो आवाज कानी घुमतो आहे... बदलले दिवसांचे चक्र सुंदर झाले आयुष्य घराला आला जिवंतपणा सजीव झाल्या भिंती अन दिशा गोड गोड गोडंबी आमुची नाजूक परी सुंदर जशी गोबऱ्या गोबऱ्या गालांची टपोऱ्या बोलक्या डोळ्यांची लवकर लवकर काळ सरकला मांडीवरून तर कधी कडेवरून, मग रांगत रांगत कधी पळू लागलीस घरभर नकळत गेली दोन वर्षे मस्त आनंद जाहला हर्षे अशीच सदैव सुखी राहा हाच वरदहस्त तुला !!

ओसाड

Image
Texture photo by jcomp - www.freepik.com बाप्पा लांब गेला  बा पण लांब गेला  पक्षी लांब गेले  प्राणीही लांब गेले  सावली लांब गेली  हिरवळही लांब गेली  आधार लांब गेला  दैवत्वही लांब गेले आठवणी लांब गेल्या  आणि प्रेमही... भकास झाला गारवा आता ओसाड .. फक्त ओसाड ... 

चांगले दाणे

Image
चांगले दाणे वेचून केलेस मोठे पोट मारून सोसले अनंते उडायला शिकलो उंच आनंदे दिसत नव्हते दमलेले खांदे तयार झालो तुझ्या पंखाच्या उबेत मारल्या भराऱ्या तुझ्या छायेत शिकवण तुझी देवारुपी येते अनुभूती क्षणोक्षणी तुझ्या असण्याने असायची निश्चिति आता कळते तुझी पोटतिडकी लांब उडालो सुसाट फिरलो पंख पसरुन वाऱ्याला चिरलो दिलास धीर निराश मनास सोडले घरटे घेऊन विश्वास नवीन शोधली फांदी केला ध्यास पण कमी झाला तुझा सहवास नवीन आले पिल्लू गोड गुलाबी आठवले तुझी सोबत आणि माझे बालपण तुझे अनुभव पाहून चालू आहे प्रवास पुढे पुढे सरकत, सहवास गेलाय संपास या गुंतागुंतीची कसे सोडवू गाठी उत्तर सापडत नाही राहिले फक्त आठवणी पण उदास मनाला येते ताकद तुझ्या शिकवणीने, आशीर्वादाने नवीन उमेद नव्या जोशाने होतो सुर्योदय पंख झटकून झेप घेतो शोधण्यास चांगले दाणे...

शेवटचे 20 किलोमीटर...

Image
इंटरची (कमर्शिअल आर्ट सेकंड इयर) परिक्षा संपल्यावर, सुट्टीत सायकलवर फिरण्याची खूप इच्छा होती ! पण नेहमीप्रमाणेच काही कारणांनी जमत नव्हतं. अँडव्हान्सचे (तिसरे वर्ष) वर्ष सुरु झाल्यावर प्रवीणची चांगली ओळख झाली होती. आमचा खूप छान ग्रुप झाला होता. नन्या, सनीत, अभ्या, गजा, प्रवीण, वर्षा. अँडव्हान्स खऱ्या अर्थाने दंग्यात जाणार होतं हे नक्की. खूप मजा येत होती. कॉलेजचे आयुष्य, छान रूममेट्स आणि आवडते क्षेत्र. सुरूवातीपासूनच सायकलवर भटकंती करण्याची मला फार आवड आहे. सायकलवर फिरण्याचे अनेक फायदे आहेत. स्वस्तात फिरता येते, वेळ भरपूर लागत असल्यामुळे अनेक दिवस भटकंती करता येते, प्रवासात भरपूर वेळ असल्यामुळे छान  निरीक्षण करता येते आणि सर्वात महत्वाचे व्यायाम देखील होतो. पुणे ते  कन्याकुमारी पर्यंत जाण्याचं माझं एक स्वप्न होतं ! हे बोलता-बोलता मी प्रवीणला सांगितला आणि त्याने लगेच होकार दिला. मनामध्ये लगेचच एक एक चित्र रंगायला लागले. नकाशे, रस्त्यांचा अभ्यास, पुस्तकं गोळा करण्यास सुरवात केली. सगळेजण ओरडायला लागले की, असं कधी शक्य आहे का... वगैरे वगैरे ! पण आमचा विचार अगदी प...