वेळ ...

कोविडबाबा मुळे रोज ३० मैल प्रवास करू लागलो त्याच्या भीतीने मानवविरहित जगणं शिकू लागलो. २० वर्षाच्या रुटिनला अचानक ब्रेक मारायला लागलो या नवीन बदलांचा शोध मी हळुवार घेऊ लागलो नवीन वातावरणात नवीन रस्त्यावर रमु लागलो दिवस दिवस पुढे सरत, थोडे थोडे हसू लागलो रोज धावपळ करणाऱ्या लोकांमधे मिसळू लागलो घड्याळाच्या आज्ञेवर मी पण हळू हळू नाचू लागलो पूर्वी रात्र दिवस न पाहणारा मी आता सूर्यदय अनुभवू लागलो माझ्या पत्रिकेमध्ये निद्रेलाही थोडे स्थान द्यायला लागलो आलेल्या नवीन दिवसांचं समतोल साधू लागलो आणि नवीन प्रवास, नवीन धोरण आखून जगू लागलो. दडलेल्या इच्छा आकांक्षांकडे लक्ष देऊ लागलो जाणिवांच्या पंखांची भरारी घेऊन उंच उडू लागलो हेच आहे का स्थर्य, आनंद, समाधान असा विचार करू लागलो येणाऱ्या नवीन वळणाचा सामना निडरपणे करू लागलो.