ओखी

४ डिसेंबर २०१७ आज तारीख आहे १९ एप्रिल २०१८. साधारण एक वर्षापूर्वी आम्हाला समजले की आम्ही आई बाबा होणार आहोत. वर्षाने जेव्हा मला हि बातमी दिली तेव्हा मी अगदी सुन्न झालो. बायको इतक्या आनंदात होती... तिला रडू आवरत नव्हते आणि मला हा आनंद इतका अनपेक्षित होता की मी काही री-ऍक्शन देऊ शकलो नव्हतो. खूप वाट बघायला लावणारी गोष्ट तुमच्या समोर आली तर काय होईल... तसेच माझे झाले... एकदम सुखद धक्का... या गोष्टीला बरोबर एक वर्ष झाले. त्यानंतर नऊ महिने कसे जातील.. टेन्शन, डॉक्टर, तपासण्या, आहार... गमतीत मी कळशी वगरे उचलायची नाही असे चिडवू लागलो... एकदमच दिवस बदलून गेले... आणि चुटकी वाजवल्याप्रमाणे पाहता पाहता ४ डिसेंबर कधी उजाडला हे कळलेही नाही. त्या दिवशी माझी किवा वर्षाची काय परिस्थिती होती, हे सांगणे खूपच कठीण आहे. आदल्या दिवशी डॉक्टरांनी उद्या ऍडमिट व्हा असे सांगितले तेव्हापासून ते दवाखान्यात ऍडमिट होईपर्यंत नुसते धडधडत होते. रात्री झोपच नाही... सकाळी केव्हातरी झोप लागली आणि लगेच निघायची वेळ !! हा सगळा प्रवास शब्दात मांडणे माझ्यासाठी खरंच खूप अवघड आहे पण लिहायचा प्रयत्न करतोय. बाबा !! कसा वाटतो...